माहूरगड परिसरातील तीर्थस्‍थळे व प्रेक्षणीय स्‍थळांची माहिती



         माहूरपासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर आहे. रेणुकामातेने आपल्‍या अहिताग्नि पतीसह अग्निप्रवेश केल्‍यानंतर हृया ठिकाणी और्ध्‍वदहिक सर्व कर्म भगवान दत्‍तात्र यांनी परशुरामांकडून करून घेतले ते हे प्रसिध्‍द मातृतिर्थ हृया ठिकाणी धार्मिक पिंडदान व श्राध्‍दविधीसुध्‍दा केल्‍या जातात.

         देवदेवेश्‍वर पासून दक्षिणेस 2 किमी अंतरावर हे वनदेव देवस्‍थान आहे. वनात असलया मुळे त्‍या ठिकाणास वनदेव असे म्‍हणतात. हृया ठिकाणी यदुराजाने तपःश्‍चर्या करून दत्‍तात्रयांना प्रसन्‍न करून घेतले होते. तेव्‍हा दत्‍तात्रयाने मी कोणापासून कोणता गुण धेतला अशा चोवीस गुणंचे वर्णन युदराजास या ठिकाणी सांगितले आहे.

         वनदेवपासून 1 किमी अंतरावर आहे. कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्‍यंत जागृत ठिकाण आहे. दत्‍तात्रयांच्‍या पादुका ह्या ठिकाणी आहे. हृया ठिकाणी भगवान दत्‍तात्रयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण आहे.

         माहूरपासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर कलियुगात रेणुकामातेने संत विष्‍णूदासांना साक्षात दर्शन दिलेले पवित्र स्‍थान. हृयाच ठिकाणी संत विष्‍णूदासांची समाधी आहे व ज्‍या स्‍वरूपामध्‍ये रेणुकेने विष्‍णूदासांना दर्शन दिले ते मूळस्‍वरूप चित्र हृया ठिकाणी आजही दर्शनार्थ आहे. हे स्‍वरूपचित्र स्‍वतः विष्‍णूदासांनी काढलेली आहे.

         झंपटनाथ मंदिर हे माहूरपासून दक्षिणेस 1 किमी अंतरावर आहे. झंपटनाथ हा कालिकामातेचा पुत्र असून माहूरचे ग्रामदैवत आहे.

         श्री रेणुकामाता मंदिराच्‍या दक्षिणेला देवी गडावरून पायथ्‍याशी 50 पाय-या स्थित आहे.

         रेणुका मंदिराच्‍या उत्‍तरेला रामगड किल्‍लामध्‍ये महाकालीचे स्‍थान आहे. गोंडराजांनी देवीची प्रतिष्‍ठापना केली आहे.

         माहूरपासून 5 किमी भगवान दत्‍तात्रयाचे निवासस्‍थान आहे.

         माहूरपासुन 6 किमी अंतरावर अत्रीऋषीव महासती अनुसया मातेचा आश्रम आहे.

         माहूरपासून 8 किमी अंतरावर असून महासती अनुसया मातेची सयामय ही भगिनी आहे.

         श्री दत्‍तशिखर संस्‍थानच्‍या पायथ्‍यापासून अगदी जवळ हे स्‍थान आहे. शिख्‍री संस्‍थानवर दत्‍तप्रभूस या तीर्थाच्‍या जलानेच अभिषेक होतो.

         माहूर शहरातच असून भगवान श्री दत्‍तात्रायाचे हे निद्रास्‍थान आहे. श्री चक्रधर स्‍वामी मंदिर ही येथे आहे.

         शेखफरीद हे परम दत्‍तभक्‍त असून त्‍यांना दत्‍तात्रयांनी दर्शन देवून कृपांकित केले आहे. हिंदू मुस्लिमांचे श्रध्‍दास्‍थान आहे. येथील निसर्गरम्‍य परिसरातील धबधबा हे प्रेशणीय स्‍थळ आहे.

         माहूर शहराला लागूनच 1 किमी अंतरावर आहे. सुफी संताचा हा पवित्र दरगाह असून हिंदू-मुस्लिमांचे श्रध्‍दास्‍थान आहे.

         हे संग्रहालय माहूर शहरातच स्थित असून येथे आदिवासी बंजारा सांस्‍कृतिक ठेवा जपून ठेवला आहे. पुरातन पाणी, नाणी, शस्‍त, प्राण्‍यांचे सांगाडे, विविध प्राचीन दगडी व विविध धातूच्‍या मूर्त्‍या व हस्‍तशिल्‍पे येथे जतन करून ठेवल्‍या आहेत.