देवी महात्म्यात नवरात्राचे अनन्य साधारण महत्व आहे.
हा नवरात्र उत्सव म्हणजेच आदीशक्तीच्या पराक्रमाचा – शौर्याचा, रणसंघराचा पवित्र काळ,
सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्ट राक्षसां सोबत घणघोर युध्द करुन, आपला पराक्रम दाखविला
तो हा कालखंड, महिषासुर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्द करुन. त्याचा वध केला.
तो हा कालखंड अश्विन शुध्द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली
असा हा कालखंड हयाच कालखंडास शारदीय नवरात्र असेही म्हणतात.
शारदीय नवरात्रोत्सव रेणुकेच्या गडावर अतिशय शुचिर्भुत वातावरणात, निस्सिम श्रध्देने साजरा केला जातो.
अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते.
विधीवत पुजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्या कुंडा मध्ये मातृका भरुन त्यावर विवीध पाच प्रकारचे धान्य टाकल्या जाते.
त्या कुंडावर मातीचाच कलश देऊन नागवेलीचे पान व श्रीफळ ठेवल्या जाते
व त्या कुंडाच्या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्पहार अर्पण केल्या जाते व प्रतिपदे पासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्या जाते.
त्याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्थापने पासून ते दस-या पर्यंत पायस म्हणजे दहीभात, पुरण-पोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो.
घटस्थापने पासून चार दिवस पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पुजा विधी नियमीत केल्या जातात.
नवरात्रातील पंचमीस देवीचे मुखकमल अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक असते.
हया दिवशी देवीची अलंकार पुजा केली जाते. महापुजा व महाआरती केल्या जाते
व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो व सुर्यास्तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्या जाते.
नवरात्रातील सप्तमीस जवळील महाकालीच्या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पुजा केली जाते
व महाकालीस महावस्त्र अर्पंण केल्या जाते.
आष्टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पुजा विधी झाल्या नंतर गुप्त अजाबळी दिला जातो
व नंतर यज्ञास सुरवात होते. सप्तशतीचे पारायण केल्या जाते. होमा मध्ये समिधा टाकल्या जातात.
दहीभात, धान्य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमा मध्ये अर्पण केल्या जातात. या पूर्वी नवग्रहाची पुजा केली जाते.
सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरवात होते.
नवमीस दिवसभर अष्टमी प्रमाणेच पुजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन नवार्ण मंत्राचा जप केल्या जातो
व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते
व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पुजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते.
नवरात्रीच्या पूण्य काळात देवीच्या विविध रुपाच्या दर्शनाचा लाभ भाविकास होतो.
हया काळा मध्ये रेणुकेच्या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.