ऐतिहासिक माहूर



         गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदीर आहे. हे मंदीर अनादी काळापासून येथे असावे असे सांगण्यात येते. हे मंदीर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदीराच्याद मुख्यं दरवाजाची पुन्रबांधणी ही इ.स. 1546 मध्येा झाली असून त्याची खुण मुख्या दरवाजावर बसविण्यासत आली आहे. हया मंदीराचा विस्तानर साडे तिनशे वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स. 1624 च्या सुमारास केला आहे. हे मंदीर वास्तु शास्त्राच्या नियमानुसार उभारण्यानत आले आहे. मंदीर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभा-यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभा-याचे प्रवेशव्दासर चांदीच्याव पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.

         दक्षिणाभिमुख चांदीने मडविलेल्यात प्रवेशव्दारातून आपण प्रत्यटक्ष रेणुकेच्या मंदीरात प्रवेश करतो. रेणुकेचे वंशपरंपरागत सेवा करणारे विविध पुजा-अर्चना करणारे मुख्यप पुजारी मराठाभोपी हयांच्यात देवीच्याव गाभा-यातील मंत्र विधीचे उच्चाखरण वातावरणात चैतन्य् निर्माण करते. जेंव्हा नम्र होऊन पूर्वाभिमुख असलेला रेणुकेच्यात तांदळा स्वरुप तेजपुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते. तेंव्हा अत्यंयत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल आपले चीत्तत केंद्रीत करते. भक्तांदकडे कृपादृष्टीष टाकणारे सुवर्णनैन, रक्ततवर्ण सींदुरचर्चीत मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यानवर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पिवळा पितांबर नेसल्याने ती अधीक मंगलमुर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट लावलेला असुन, मुखामध्येभ तांबुल रंगलेला आहे. हजारो सुर्याचे तेज तिच्याख मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तआवेधक-भेदक नजर सरळ आपल्यान –हदया मध्येा जाते.

         या मंदीराशिवाय या परिसरात कोल्हापूरची महालक्ष्मी देवी व तुळजापुरच्या तुकाई देवीचे मंदीर आहे.