चैत्र शुक्लष प्रतिपदेला येणारा नव वर्षाचा सण व वर्षारंभिचा पूण्य प्रद मुहूर्त गुढी पाडवा मोठया उत्सागहात व निस्सिम श्रध्देणने रेणुका दरबारी साजरा होतो. ही गुढी गडावरील रेणुकेच्याह मुख्यश निशाणा जवळ उभारली जाते. एकात वेळूच्या लांब काठीच्या शिरोभागी नवीनवस्त्रष, पातळ लाऊन त्यारवर उबडा तांब्यामचा कलश ठेवला जातो. त्याय गुढीला खोबरे-खारीक यांची माळ व अंब्यानच्याव पानाने सजविले जाते व नंतर त्या गुढीची विधीवत पुजा अर्चना होते नंतर रेणुकेस पंचामृतादिनी स्नानन घालून हळद-कुंकू भाळी लाऊन महावस्त्री बनरसी पैठणी देवीस नेसवीली जाते व संपूर्ण श्रृंगार करून पुरण पोळीचा नैवेद्या दाखविला जातो व नंतर मुखात पानाचा विडा भरविल्या जातो आणि मग धुप-दिप दाखवून महाआरती केल्या जाते नंतर गुढीला सुध्दा पानाचा चा नैवेध दाखविला जातो. गुढी पाडव्याच्या शुभ पर्वावर पानाचा हा मुख्य प्रसाद मानला जातो.
त्या प्रसादाचे सेवन पवित्र आणि आरोग्यव वर्धक आहे. चनादाल, गुह, कडुलिंबाची कोवळी पाने, कांदा, हींग, यांच्याय मिश्रणास पनर असे म्हणतात. हा पनर चा प्रसाद गुढील अर्पण केल्या नंतर त्या, गुढीची महाआरती केल्याम जाते व गडावरील संपूर्ण देवी- देवतांना नैवेध दाखवून विधीवत पुजा केली जाते. सुर्यास्तापूर्वी गुढी उतरवून त्या वरील वस्त्रण व मंगल कलश काढून फक्त ती वेळूची काठी व अंब्याची पाने तशीच बारशी म्हणजे 12 दिवसा पर्यत ठेवली जाते. व बारशी एकादशीस पनर चा नैवेध दाखऊन हृया पर्वाची सांगत होते. नववर्ष आणि पावन मुहूर्त असल्यासने हृया मंगलवार पर्वात सहभागी होऊन व देवीच्या् दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या इच्छित कार्याचा प्रारंभ हा सफलदायी होतो व तसा अनेक भावीकांना अनुभव ही आलेला आहे.